वाटंबरे येथे ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात.
वाटंबरे येथे ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात.
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे २१ मे मंगळवार २०२४ पासून ते २८ मे मंगळवार पर्यंत ह .भ .प दादा महाराज शेटफळकर, ह. भ. प. धोंडोपंत दादा महाराज पंढरपूर व ह.भ.दत्तू बुवा वाटंबरेकर यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे. यात दररोज काकडा आरती, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, असे विविध कार्यक्रम होत आहेत.
या सप्ताहादरम्यान २१ मे मंगळवार , ह.भ.प. मच्छिंद्र जगताप महाराज (वाटंबरे), २२ मे बुधवार ह.भ.प. कृष्णा महाराज ननवरे पिंपरीकर , २३ मे गुरुवार ह.भ.प. नवनीत महाराज क्षिरसागर करगणी ,२४ मे शुक्रवार ह.भ.प. भानुदास महाराज टेंभुकर , २५ मे शनिवार ह.भ.प. प्रदीप महाराज ढेरे शेंडेचिंच , २६ मे रविवार ह.भ.प. सुशांत महाराज घोडके पाचेगावकर , २७ मे सोमवार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या सर्वांचा या सप्ताह मध्ये कीर्तन सेवचा लाभ मिळणार आहे. मंगळवार दि २८ मे रोजी सकाळी आठ वाजता दिंडी प्रदक्षिणा व सकाळी दहा वाजता काल्याचे किर्तन ह. भ. प एकनाथ महाराज पंढरपूरकर धोंडोपंत दादा संस्थान यांच्या कीर्तन सेवाने होणार आहे
तरी वाटंबरे ग्रामस्थ व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी, भाविक भक्तांनी व बालगोपाळाणी या ज्ञानेश्वर पारायण हरिनाम सप्ताह, किर्तन सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान सप्ताह संचालक ,समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ वाटंबरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments