Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ३ मार्च, २०२४

युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या हस्ते शिक्षक पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार*

 *युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या हस्ते शिक्षक पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार* 


नाझरे प्रतिनिधी 

                  युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या शुभहस्ते नाजरे ग्रामपंचायत मध्ये शिक्षक पात्र विद्यार्थी प्रणव राज शेटे, आमिर तांबोळी, अमित खंडागळे, प्रदीप पाटील, यशवंत खरात यांचा व श्रीधर कन्या प्रशालेचे नूतन पर्यवेक्षक शहाजान मुलाणी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

              सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक शिवभूषण ढोबळे यांनी केले. यावेळी बऱ्याच वर्षांनी शिक्षक भरती झाली व स्पर्धेचे युगात यश मिळवले त्यामुळे त्यांचा सत्कार करताना आनंद होत आहे असे मत डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आम्ही सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे काम चांगले करू असे सांगितले.

           यावेळी प्राध्यापक हनुमंत कोळवले, प्राध्यापक कोकरे, डॉक्टर जगताप, उत्तम भाऊ सरगर, बंडू मामा दाटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसोडे, अण्णासाहेब सरगर, पत्रकार रविराज शेटे, अतुल फसाले, चेअरमन बंडगर, वाय चेअरमन राजाभाऊ कोळेकर, माजी सरपंच शामराव वाघमारे, रशीद काझी, समीर मुलानी, व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार अतुल फसाले यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart