कडबा पेटल्याने शेतकऱ्याचे नुकसान.
{अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल}
सांगोला तालुका बलवडी येथे सुरेश काशिनाथ बदडे यांच्या शेतातील पाचशे कडबा जळाल्याने शेतकऱ्याचे नऊ हजाराचे नुकसान झाल्याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध सांगोला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे की सुरेश काशिनाथ बदडे यांनी पंधरा दिवसांपूर्वी शेतातील ज्वारीची काढणी केली होती त्या ज्वारीचा निघालेला पाचशे कडबा विकायचा असल्यामुळे त्या ठिकाणी शेतात ठेवला होता व त्या कडब्याची शेकडा अठराशे रुपये प्रमाणे विक्री केली होती.
बुधवारी रात्री अकरा वाजता शेतकऱ्याचा भाऊ गोरख बदडे यांनी कडबा पेटल्याची माहिती शेतकऱ्याला येवून दिली त्या वेळी शेतकरी व त्याच्या पत्नीने शेतात जाऊन पाहले तर त्या कडब्याची पुर्ण राख झालेली होती .
यावेळी शेतकऱ्याने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नैसर्गिक किंवा अज्ञात ईसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला .
या घटनेची चौकशी सांगोला पोलीस स्टेशन करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा