Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ६ मार्च, २०२४

सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे प्रणव राज शेटे यांचा सत्कार संपन्न*

*सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे प्रणव राज शेटे यांचा सत्कार संपन्न*

सांगोला प्रतिनिधी
               सांगोला तालुका पेन्शनर संघटनेची बैठक अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली वाढेगाव ता. सांगोला येथे संपन्न झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराचा हेतू तसेच नवीन सभासद करणे गरजेचे आहे असे प्रास्ताविकात संघटनेचे सदस्य विलास नलवडे यांनी सांगितले.
            शिक्षकी पेशा संघर्षातून प्राप्त झाला असून त्याचे पवित्र राखण्याचे अभिवचन देतो असे सत्कार मूर्ती नूतन शिक्षक प्रणव राज शेटे यांनी सांगितले. तर एक वेळ विमान प्रवास कुटुंबासमवेत करा मी केला असे दुसरे सत्कारमूर्ती दत्तात्रय खामकर यांनी सांगितले. तर वयाच्या 90 व्या वर्षी मोठ्या उत्साहात साबळे गुरुजींनी यापुढेही आपले आयुष्यमान वाढावे यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी असे सत्कार प्रसंगी सांगितले. तसेच वाडेगाव ग्रामपंचायत विजयी झालेल्या सौ शकुंतला वसंतराव दिघे यांचा व सोसायटी व्हा. चेअरमन पदी वसंतराव दिघे, तर ग्रामीण पतसंस्था शिनगारे साहेब, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माने साहेब, पंचायत समिती कर्मचारी शिर्के व कवडे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तर सत्कारातून ऊर्जा प्राप्त होते व नव्या उमेदीने काम करण्याची ताकद येते असे मत सल्लागार प्रभाकर कसबे यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव नागणे, नामदेव भोसले, कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे, खजिनदार गंगाराम इमडे, सल्लागार शंकर सावंत, दिनकर घोडके, सिद्धेश्वर झाडबुके, प्रभाकर कसबे, शिक्षिका योगिता शेटे, रविराज शेटे, सहसचिव दत्तात्रय खामकर, ग्रामस्थ व दिघे परिवार उपस्थित होता. सूत्रसंचालन विलास नलवडे तर आभार प्रदर्शन सिद्धेश्वर झाडबुके यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart