Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ४ मार्च, २०२४

प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे अंतर्गत ३२७८ बालकांना पोलिओचा लाभ.

 प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे अंतर्गत ३२७८ बालकांना पोलिओचा लाभ.

      पोलीओची लस देताना तालुका वैद्यकीय अधिकारी अविनाश खांडेकर ,आरोग्य सहाय्यक अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधु गडदे


वाटंबरे /प्रतिनिधी :"दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलीओवर विजय दरवेळी" हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने तीन मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली गेली.

सांगोला तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे अंतर्गत पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली या वेळी ०ते५  वर्षे वयोगटातील ३४५०बालका पैकी ३२७८ बालकांना  पोलीओचे लसीकरण करण्यात आले. पल्स पोलिओ लसीकरणासाठी बेचाळीस बूथ उभारले  होते यामध्ये ११८ कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,मदतनीस, सात पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अविनाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अजीत धायगुडे ,डॉ. अमोल येलपले वैद्यकीय अधिकारी नाझरे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य सहाय्यक अंकुश वाळके, अशोक कलाल, भारती भोसले यांच्या नियोजना खाली ही मोहीम पार पडली.

पोलीओ पासून वंचित राहिलेल्या बालकांना त्यांच्या घरोघरी जाऊन त्या  लस देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी दिली गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart