महुद बुद्रुक येथे स्फोटात १ ठार; १ गंभीर जखमी
सांगोला तालुक्यातील महुद बुद्रुक येथील एका गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकजण जागीच ठार तर एक अन्य एक भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास महुद बुद्रुक (ता. सांगोला) येथे घडली. या स्फोटात घराच्या भिंती, खिडक्या उडून जमीनदोस्त झाल्या.
अतुल आत्माराम बाड (वय २७, रा. विठलापूर, ता. आटपाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे; तर दीपक विठोबा कुटे (रा. शिवापुरी, ता. आटपाडी) असे जखमीचे नाव आहे. मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी अतुलच्या घातपाताचा संशय व्यक्त


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा