*जि.प. वझरे शाळेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
जि.प. प्रा. शाळा वझरे ता. सांगोला या शाळेतर्फे शिक्षक पात्र विद्यार्थी प्रदीप पाटील, प्रणव राज शेटे, यशवंत खरात, महेश यादव तसेच आर्मीत निवड झालेले सिद्धार्थ पाटील, अग्निशामक मध्ये निवड झालेले संकेत गुरव इत्यादींचा भव्य सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य के. वाय. पाटील हे होते.
सुरुवातीस शिक्षिका लता पाटील यांनी सत्काराचे कारण सांगितले व शिक्षिके पेशात काम करताना लहान मुले ही देवासारखे आहेत व त्यांना देव मानून चांगले मार्गदर्शन करून ज्ञान द्या असे सांगितले. तर सत्कारमूर्ती प्रदीप पाटील, यशवंत खरात व महेश यादव या नूतन शिक्षकांनी ज्ञानदानाच्या कामात कमी पडणार नाही याची ग्वाही दिली तर सिद्धार्थ पाटील यांनी आपण देश सेवेसाठी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली.
सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश रेड्डी, उपाध्यक्ष नरसु निंबाळकर, माजी सरपंच राजू पाटील, पत्रकार रविराज शेटे, शिक्षण प्रेमी वसंतराव पाटील, स्वप्निल गुरव, सुनील वाघमारे, राणी वाघमारे, मुख्याध्यापक खंडू गाडेकर, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी शिक्षिका मेघा राणी गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा