लेख. समाजभूषण शाम पवार- एक प्रेरणास्त्रोत*
लेख.
समाजभूषण शाम पवार- एक प्रेरणास्त्रोत*
पुरस्कार स्वीकारतानाडोंगरवाचे शाम पवार यांना कोल्हापूर येथील समता स्वराज फाउंडेशन संस्थेच्या मार्फत दरवर्षी दिला जाणारा 'समाजभूषण' या पुरस्काराने गौरविण्यात आले.डोंगरगाव ,सांगोला तालुकासाठी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाची बाब असून ,त्यांच्या सार्वजनिक जीवनात आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव आहे.
कॉलेज जीवनात हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखले गेले , नाटक, गीते,एकांकिका यामध्ये सतत सहभाग होऊन सांस्कृतिक वारसा जपला व महात्मा फुले समाजसेवी संस्था करमाळा या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरवात झाली.रेखाताई केदार व लालासो पाटील यांच्या साथीने अंधश्रद्धा निर्मूलन, महिला समस्या, दुर्लक्षित घटक यांच्यासाठी मोठे कार्य केले.ही त्याची सामाजिक व सांस्कृतिक कार्याची सुरवात झाली.यानंतर उत्कर्ष शिक्षण व समाजसेवी संस्था स्थापन करून संस्थेच्या माध्यमातून आपलं समाजकार्य चालू ठेवले.यामध्ये अपंग लोकांना मोफत कृत्रिम हात-पाय,खुर्ची, आधार काठी इ.साहीत्य पुरवठा केला,स्वच्छता अभियान, महिला मेळावे, आरोग्य शिबीर, रोजगार हमी, रोजगार जागृती शाखा,
गावांमध्ये महिलांचे संघटन करून दारूबंदी ,स्वच्छ व व्यसनमुक्त गाव चळवळ उभी केली,सफाई कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले, चार हृदरोग्यांना मदतीचा हात देवून त्यांना नवीन जीवदान दिले,गावामध्ये युवकांचे संघटन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली त्यामुळे शिवजयंती पासून वेगवेगळे सण उत्सव साजरे केले गेले.क्रीडा क्षेत्रात क्रिकेट पासून ते वेगवेगळ्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिले. त्याच बरोबर गावाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी वेळोवेळी संघर्ष व आंदोलने केली. यामध्ये डोंगरगाव रेल्वे स्टेशन ,रेल्वेचा थांबा होणेसाठी इतकेच नाही रेल्वे स्टेशन चे नामकरण 'म्हसोबा डोंगरगाव' होण्यामध्ये शाम पवार यांची महत्वाची भूमिका आहे.इतकेच नाही तर नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या 'बचपन बचाओ' या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन व त्यांचे गुरु जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात व हरीश चिकने यांच्या सानिध्यात व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल झाला,कडलास चे नरेंद्र गायकवाड, माढयाचे हणमंतराव बरबोले,करमाळयाचे सदाशिव पांडव व मंगळवेढ्याचे भोसकर गुरुजी यांचे सतत मार्गदर्शन लाभले.
राजकीय कार्याची सुरवात शिवसेनेच्या माध्यमातून डोंगरागाव,सोनंद,माणेगाव,लोणविरे या भागात मोठया प्रमाणावर संघटनात्मक काम केले. काँग्रेस मध्ये किसान सेल तालुका अध्यक्ष पदावरून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले,व2015 विधानसभा निवडणुकीत यशोमतीताई ठाकूर यांच्या 'तिवसा, 'जिल्हा अमरावती या विधानसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून व नंतर झालेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांच्या चिंतन ग्रुप सोबत निरीक्षक म्हणून काम केले.
हे करीत असताना त्यांचा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा स्वभाव, ओठ व पोट यांच्यामध्ये अंतर न राखता रोख ठोक बोलणे,सर्वधर्मसमभाव,गरिबांच्या विषयी कळवळा, सामाजिक सलोखा राखण्याची वृत्ती,चिकाटी, हातात घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी व अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहणे, कोणत्याही समस्येवर योग्य मार्गदर्शन करणे या त्यांच्या गुणांमुळे त्यांचा मित्रपरिवार सतत त्यांच्या बरोबर व पाठिशी असतो.त्यांच्यासाठी ते एक प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
त्यांनी रुळलेल्या वाटेवरून न चालता नवीन मार्ग निर्माण केले.कौटुंबिक आयुष्यात अनेक दुःखाचे प्रसंग आले त्यावरती त्यांनी मात केली ,अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन आपल्या विचारावावरती ठामपणे उभे राहून समाजसमोर एक आदर्श निर्माण केला .
त्यांच्या कार्याची दखल घेऊन आशा आदर्श व्यक्तिमत्वाचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान झाल्याने त्यांच्या पुढील कार्यास प्रेरणा मिळाली. त्यांचे उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणने, महिला मल्टीस्टेट बँक,वृद्धाश्रम, संपुर्ण व्यसनमुक्ती हे त्यांचे स्वप्न पूर्ण होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊ.......
दिगंबर साळुंखे
मुख्याध्यापक
केंद्रीय आश्रमशाळा सोनंद
९०४९१०६८५३



No comments