वाटंबरे येथे हरघर केसीसी अभियान संपन्न.
सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी गुरुवार २८ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वाटंबरे यांच्या वतीने नाबार्ड व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घरघर केसीसी अभियान अंतर्गत किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांकरिता जागरूकता शिबिर व आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाखाधिकारी नागनाथ साळुंखे यांनी पीक कर्ज वाटप, तसेच बँकेत उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधांची माहिती उपस्थितांना देत त्यांना मार्गदर्शन केले .
या ग्राहक मेळाव्यास महिला बचत गटातील महिला तसेच बँकेचे खातेदार व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे येथील नागरिक या ग्राहक मेळाव्यास उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा