Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पारे ग्रामस्थांनी दिले आभार पत्र.

 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पारे ग्रामस्थांनी दिले आभार पत्र.





वाटंबरे /प्रतिनिधी: पारे  {सांगोला} या गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची  तीस वर्षे झाली  खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. या रस्त्यावरून जाताना गावातील विद्यार्थ्यी , वयोवृद्ध नागरिक , दुचाकी स्वार यांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये छोटे-मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर घडत होते. यावेळी पारे ग्रामपंचायत  यांच्याकडून मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांना ग्रामपंचायत कडून रस्त्याची मागणी करण्यात आली होती  त्यावेळचे सामाजिक न्याय मंत्री व सध्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करून हा रस्ता मंजूर करून घेतला होता. धनंजय मुंडे यांनी मंजूर केलेल्या रस्त्या आज वाहतुकीस पूर्ण खुला आहे.त्यानी तत्परतेने मंजूर करून केलेल्या कामाचे आभार व्यक्त करण्यासाठी  आज दौऱ्या निमित्त पंढरपुर येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे आले असता  पारे गावचे मा.सरपंच संतोष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पत्र देऊन आभार मानले व तुमच्यामुळे आमचा पिढ्यानपिढ्याचां प्रश्न मार्गी लागला असे बोलून आभार मानले.


 यावेळी धनुभाऊ यांनी आभारपत्र वाचून गावामध्ये अजून काय प्रश्न असतील तर सांगा आम्ही ते प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी त्यांनी या.सरपंच संतोष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले .


चौकट: पारे  {सांगोला} या गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची  तीस वर्षे झाली  खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. या रस्त्यावरून जाताना गावातील विद्यार्थ्यी , वयोवृद्ध नागरिक , दुचाकी स्वार यांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये छोटे-मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर घडत होते. यावेळी पारे ग्रामपंचायत  यांच्याकडून मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांना ग्रामपंचायत कडून रस्त्याची मागणी करण्यात आली होती  त्यावेळचे सामाजिक न्याय मंत्री व सध्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करून हा रस्ता मंजूर करून घेतला होता. धनंजय मुंडे यांनी मंजूर केलेल्या रस्त्या आज वाहतुकीस पूर्ण खुला आहे त्यांनी केलेल्या कामाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी  मी व माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना आभार पत्र देऊन पारगाव च्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.

                          मा.सरपंच 

                          संतोष पाटील.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart