वाटंबरे येथे वानराच्या हल्ल्यात वयोवृद्ध नागरिक जखमी.
वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे वानरांच्या कळपाने उच्छाद मांडला असून त्यातील एका वानराने सत्तर वर्षाचे दत्तू सुदाम गेजगे यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाला चाऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली या वेळी आजूबाजूच्या नागरिक ओरडल्याने वानर पळून गेले. या घटनेनंतर दत्तू गेजगे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ सांगोला येथील शासकीय दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले. वन विभाग अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दवाखान्यामध्ये जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी त्याना दत्तू गेजगे यांच्या पायाला वानर चावल्याने बारा ते तेरा टाके पडल्याचे आढळून आले . या घटनेनंतर वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार यांनी फोनवरून वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम जाधवर यांनी त्यांच्या विभागातील कर्मचारी यांना वाटंबरे येथे तात्काळ पाठवून दिले यावेळी या विभागातील कर्मचाऱ्यांना एका वानराला पकडण्यात यश आले. वाटंबरे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी चार ते पाच वानर वास्तव करीत होते आता त्यांची संख्या विस ते पंचवीस झाली आहे. वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने ते खाण्यासाठी शेतीचेही नुकसान करत आहेत तसेच खाण्यासाठी नागरी वस्तीमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे ते गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनवरती हल्ला करत आहेत त्यामुळे गावातील नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे तरी वन विभाग यांनी तात्काळ या कळपातील वानरांना जेरबंद करून वनात सोडून द्यावे असे वाटंबरे ग्रामस्थां मधुन मागणी होत आहे.
चौकट: वानराच्या हल्ल्यात जखमी झालेले दत्तू सुदाम गेजगे यांचा मी स्वतः जाऊन पंचनामा करत त्यांचा जबाब घेतलेला आहे तरी शासनाच्या नियमाप्रमाणे वन विभागामार्फत त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल . तरी तालुक्यात अवैध वृक्षतोड , अवैध वृक्षतोड वाहतूक, वन्य प्राण्याची शिकार वन्य प्राण्यांनी पाळीव प्राण्यांचे केलेले नुकसान, एखाद्या व्यक्तीवर वन्य प्राण्यांनी केलेला हल्ला असेल तर त्वरित तालुक्यातील नागरिकांनी वनपरिक्षेत्राची संपर्क साधावा {तुकाराम विठ्ठल जाधवर मो:9420378279}







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा