सांगोला (तालुका प्रतिनिधी): डोंगरगाव ता.सांगोला येथील रमेश महादेव पाटील यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने या आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. पाटील कुटुंबाला दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
डोंगरगाव ता.सांगोला येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे पाटील कुटुंबीय या धक्क्याने रस्त्यावर आले. राहते घर आगीत जाळून खाक झाल्याने रमेश पाटील यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाटील कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नवनाथ पवार, दुर्योधन हिप्परकर, विजय इंगोले, वसंत सुपेकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा