Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या- मा आ दीपक आबा साळुंखे पाटील*


 *विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या- मा आ दीपक आबा साळुंखे पाटील*

*नाझरे येथील रामोशी समाजाच्या अनेक युवकांचा राष्ट्रवादी प्रवेश*

नाझरे प्रतिनिधी

             नाझरे ता सांगोला ही श्रीधर व संजीवा स्वामी महाराजांची नगरी असून या गावास ऐतिहासिक इतिहास आहे कारण या गावातील खासदार तायाप्पा हरी सोनवणे होऊन गेले व कै माजी आमदार काकासो साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील प्रथम पाण्याच्या योजना आणल्या व आपणावर काकाची शिकवण असल्यामुळे आपण कोणावरही टीका टिप्पणी न करता आजपर्यंत पक्ष पार्टी जात-पात न बघता विकासाचे राजकारण केले व यापुढे करणार असून यासाठी सर्वांनी साथ द्या व या गावातील रामोशी व इतर समाजातील युवकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला त्यांचा योग्य सन्मान केला जाईल व त्यांच्या पाठीशी आपण स्वतः राष्ट्रवादी पक्ष ताकतीने उभा राहील यांची ग्वाही देतो असे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश प्रसंगी नाझरे ग्रामपंचायत समोर सभेत मत व्यक्त केले अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील हे होते.

         सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे गतिमान नेतृत्व असून विकासासाठी आम्ही त्यांना साथ दिली असून आज पक्षात प्रवेश केलेले सर्व नव युवकांना न्याय देऊन त्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवू व राजाभाऊ गुजले यांनी समाजाची व्यथा मांडली ती येत्या एक वर्षात यात बदल होईल व काही कमी पडू देणार नाही याची ग्वाही देतो असेही यावेळी आबासाहेबांनी सांगितले सुरुवातीस नाझरे गाव हे बारा बलुतेदारांचे असून अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागे आबा व राष्ट्रवादी पक्ष पाठीशी राहील असे प्रास्ताविकात युवा नेते दादासो हरिहर यांनी सांगितले तर पक्ष पार्टी न बघता आबांचे विकासाचे काम असून नाझरे येथील रामोशी समाज बांधवास समाज मंदिर व तालीम बांधून द्या व आबा आपले दैवत असल्याचे समाजाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ गुजले यांनी यावेळी सांगितले तर समाजाने व्यसनापासून दूर राहावे व रक्ताचे पाणी करू परंतु 2024 ला आबांना आमदार करू असे मत तालुका कार्यक्षेत्र अध्यक्ष शिवाजी कोळेकर यांनी व्यक्त केले तसेच यावेळी योगेश वलेकर नवनाथ मोरे यांनीही मत व्यक्त केले तर तालुक्याचा विकासासाठी आबांचे योगदान असून त्यांना आमदार करू असे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी सांगितले तर घराघरापर्यंत आबांचे विचार पोहोचवा व एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असे नेत्याचे काम आहे असे नगरसेवक शिवाजी बनकर यांनी सांगितले.

          सदर प्रसंगी अरुण चव्हाण अनिल मंडले अंकुश चव्हाण कलाप्पा चव्हाण राज चव्हाण योगेश चव्हाण सुनील मंडले नितीन मंडले गुरुनाथ मंडले अजय पाटोळे तात्यासो चव्हाण संतोष हरिहर महेश बुधावले एकनाथ जाधव करण चव्हाण स्वप्निल चव्हाण उमेश रणदिवे सुरज रणदिवे उमेश चव्हाण सोमनाथ चव्हाण संजीव हरिहर दत्ता चव्हाण सागर मंडले प्रमोद चव्हाण सिद्धनाथ गीते ज्ञानेश्वर जाधव या युवकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला.

          तसेच यावेळी दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले अध्यक्ष अनिल नाना खटकाळे उपाध्यक्ष डॉ राज मिसाळ गणेश कोळेकर मा उपसरपंच विजय पवार माजी सरपंच विनायक मिसाळ सरपंच नाथा खंडागळे बिरा पुकळे चेअरमन भिकाजी बाबर उपसरपंच समाधान शिंदे बाबा करांडे ग्रामपंचायत सदस्य अनिल जगदाळे सरपंच संजय कोकरे महादेव पवार अशोक पाटील आबा पवार चंद्रकांत चौगुले संतोष पाटील नारायण माळी न्यानेश्वर शिंदे अजय गोडसे संजय आलदर वस्ताद बंडगर बिरा गेजगे (पं स सदस्य) सूर्यकांत आदाटे बसवेश्वर आदाटे पांडू वाघमारे ओंकार देशपांडे शिवाजी बनसोडे सचिन वाघमारे सुशांत ऐवळे सागर वाघमारे भैया काझी रोशन भोसले फिरोज मुलाणी जीवन भंडगे विनोद देशमुख असलम पटेल माजी प्राचार्य के वाय पाटील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार माजी उपसरपंच नागेश रायचूरे यांनी मानले.


No comments