Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

राज्यस्तरीय मॅरॅथाॅन स्पर्धेत गौरव पवार ची कौतुकास्पद कामगिरी .*

 *राज्यस्तरीय मॅरॅथाॅन  स्पर्धेत गौरव पवार ची कौतुकास्पद कामगिरी .*



   *( शिराळा प्रतिनिधी :-) कर्ण प्रतिष्ठान इस्लामपूर आयोजित   राज्यस्तरीय भव्य मॅरॅथॉन स्पर्धेत देशभक्त करिअर अॅकॅडमी, व विवेकानंद सैनिकी प्रशिक्षण कनिष्ठ महाविद्यालय मांगरुळ ता शिराळा येथील 11वी सायन्सच्या गौरव बाबासाहेब पवार    या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक मिळवून  यश संपादन केले.हजारो स्पर्धकांचा प्रतिसाद लाभलेल्या  या स्पर्धेत या विद्यार्थ्यांने सर्व  स्पर्धकामध्ये  सुरवातीपासूनच जोरदार आघाडी घेत विक्रमी वेळेत यश संपादन केले*.  *16ते 30वयोमर्यादा असलेल्या गटात या  विद्यार्थ्यांने  मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल प्रेक्षक व संयोजकांनी आश्चर्य व्यक्त करत संस्था  व विद्यार्थ्यांबाबत विशेष गौरवोद्गार काढले*


*देशभक्त संकुलाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, घेतलेला कसून सराव व पोषक आहार या गोष्टी  यशाला कारणीभूत आहेत असे मत  गौरव पवार याने व्यक्त केले* 

*त्याचा युवानेते  प्रतिक जयंत पाटील यांच्या हस्ते   ट्राॅफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला* 


*या विद्यार्थ्यांला संस्था अध्यक्ष मा विशाल खांडेकर सर, मुख्य अधिक्षक व फिजिकल डायरेक्टर एन आय एस कोच  मा. राहुल खांडेकर प्राचार्य  सुवर्णसिंग मस्के यांचे  मुख्यतः  मार्गदर्शन  लाभले*




No comments