सांगोला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बबन गायकवाड व प्रा. डॉ. अमोल पवार हे सीबीएस न्यूज च्या शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित.*
*सांगोला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बबन गायकवाड व प्रा. डॉ. अमोल पवार हे सीबीएस न्यूज च्या शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित.*
सी बी एस न्यूज मराठी यांच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा सांगोला येथील रामकृष्ण गार्डन विला येथे दिमागात पार पडला सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव यावेळी करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात सांगोला महाविद्यालय मधील कार्यरत असणारे प्रा. डॉ. बबन गायकवाड यांना त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या आर्थिक साह्य, एन एस एस प्रोग्रॅम ऑफिसर, वृक्षारोपण, विविध रल्याच्या माध्यमातून समाज जनजागृती, आणि शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव याचा प्रति सीबीएस न्यूज यांनी त्यांना शिक्षण रत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच प्राध्यापक डॉ. अमोल पवार यांनाही शिक्षणरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले ते विद्यार्थी प्रिय असे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बनवणे, अविष्कार ला सादरीकरण करणे, रिसर्च पेपर तयार करणे, मॉडेल्स तयार करणे इत्यादी सादरीकरण करून विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवली आहेत. सरांचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये पेपर प्रकाशित झाले आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये बेस्ट पेपर अवॉर्ड ने सन्मानित केले गेले आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप यात्रेमध्येही सोलापूर विद्यापीठाने त्यांच्या प्रोजेक्टला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर ते सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत त्यामध्ये त्यांनी वाटंबरे गावामध्ये शिक्षक वृंदाच्या माध्यमातून वृक्षारोपण करून ती सर्व वृक्ष जगवली आहेत.
कृष्णा मानगंगा नदी जोड प्रकल्प तयार करून तो शासनास सादर केला आहे हा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. मनगंगा नदी स्वच्छतेमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा सर्व दृष्टीने सर्वसमावेशक असणारे प्राध्यापक डॉ. अमोल पवार यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या पुरस्कारा नंतर संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, प्रा. पी. सी. झपके, सचिव म.सी. झिरपे, खजिनदार नागेश गुळ मीरे, सहसचिव साहेबराव ढेकळे, आदी संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, अधीक्षक प्रकाश शिंदे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






No comments