Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

संत कवी श्रीधर स्वामी देवस्थान नाझरे वतीने श्रीधर नगरीचे श्रावण बाळ पुरस्काराचा प्रदान सोहळा संपन्न*

 *संत कवी श्रीधर स्वामी देवस्थान नाझरे वतीने श्रीधर नगरीचे श्रावण बाळ पुरस्काराचा प्रदान सोहळा संपन्न* 




 *आई-वडिलांची खरी सेवा हीच ईश्वर सेवा- डॉक्टर शिवाजीराव ढोबळे* 

 नाझरे प्रतिनिधी:

                      मायबापे केवळ काशी

 तेने न जावे तीर्थाशी

 तुका म्हणे माय बापे

 अवघी देवाची स्वरूपे

    याप्रमाणे आई-वडिलांची प्रामाणिकपणे खरी सेवा केल्यास काशीला जाण्याची गरज नाही व तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे मायबापे सेवा म्हणजे अवघी देवाची सेवा व हीच खरी ईश्वर सेवा मानून श्रीधर स्वामी मंदिर नाझरे तालुका सांगोला येथे आई-वडिलांची खऱ्या अर्थाने जे सेवा करतात त्यांनाच श्रीधरनगरीचे कलियुगातील श्रावण बाळ पुरस्कार प्रदान सोहळा संयोजक जयंत काका देशपांडे यांनी घडवून आणलेला हा उपक्रम सोहळा म्हणजे खरोखरच दुग्ध शर्करा सोहळा असेच म्हणावे लागेल असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ह भ प डॉक्टर बीरा बंडगर हे होते.

       संत कवी श्रीधर स्वामी पुण्यतिथी सोहळा निमित्त नाझरे येथील मंदिरात कलियुगातील श्रावण बाळ पुरस्कार श्री व सौ यांना प्रदान करण्यात आला यावेळी जिवंतपणी आई बापाची प्रामाणिकपणे खरी सेवा करा म्हणजे ईश्वर प्राप्ती होईल परंतु बरेच जण मृत्यूनंतर अगोदर काहीही न करता दिखावा करतात हे बरोबर नाही यासाठी आजारपणात त्यांची सेवा करा तसेच वृद्धाश्रमात पाठवू नका व महत्त्वाचे म्हणजे ठिसकू नका त्यांना माया प्रेम द्या व व्यवस्थित बोला म्हणजे जीवनात काहीही कमी पडणार नाही असेही डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सांगितले.

    सुरुवातीस श्रीधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच आई-वडिलांना काशीला नेण्यापेक्षा दररोज चांगले सांभाळा व पुण्यतिथी सोहळ्याचा डामडौल करण्यापेक्षा जिवंत असताना त्यांना माया प्रेम द्या व सेवा करा, आणि जयंत काका आणि चांगला उपक्रम राबविला व सामाजिक बांधिलकी जोपासली आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे समजून श्रीधर स्वामींच्या कृपेने नाझरे या संतांच्या भूमीत दिशा देणारा कार्यक्रम केला व यामागे त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई आहे असे मत शिक्षक नेते अशोक पाटील यांनी व्यक्त केले.


     मुलाकडून आई-वडिलांना चांगले बोलणे अपेक्षित असते परंतु असे होत नाही त्यांना काही देऊ नका परंतु माया प्रेम द्या व या उपक्रमावरून यापुढील पिढी आदर्श घेतील व म्हातारपणी त्यांची सेवा करतील काशीला जाण्याची गरज नाही मायबाप काशी समजून सेवा करा असे मत आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांनी व्यक्त केले तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याप्रमाणे श्रीधर स्वामी व इतर संतांना फार त्रास सहन करावा लागला त्यामानाने आपणास काहीही नाही म्हणजे ही आई-वडिलांची पुण्याई समजून सेवा करा व मानव इतर नको त्या गोष्टी करतो परंतु अशा कार्यक्रमास येत नाही म्हणजे त्यांना परमार्थ गोड लागत नाही परंतु परमार्थ शिवाय मानवी जीवन नाही व आई बापाची सेवा करा आणि जीवन कृतार्थ करा असे ह भ प डॉक्टर बीरा बंडगर यांनी सांगितले.


   *कलियुगातील श्रीधर नगरीचे श्रावणबाळ यामध्ये सौ व श्री दगडू आडसूळ, शिक्षक श्री व सौ सचिन धोकटे, श्री व सौ नारायण आवळे, श्री व सौ विकास जावीर, श्री व सौ रघुनाथ तेली, श्री व सौ सोमनाथ पेशवे, श्री व सौ प्रकाश पाटील व संजय अडसूळ या सर्वांचा शाल साडी श्रीफळ प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला तसेच पुढील वर्षी श्रावणबाळ पुरस्कारांची संख्या वाढेल व मंदिर समितीतर्फे चांगला भव्य सत्कार करू असे संयोजक जयंत काका देशपांडे ओंकार देशपांडे यांनी सांगितले.* 

       सदर प्रसंगी संत कवी श्रीधर स्वामींच्या पदस्पर्शाने मातृ-पितृ देवो भव याप्रमाणे आमचा जोडीने सत्कार केला त्यामुळे भारावून गेलो व अनेक जणांच्या डोळ्यात पाणी आले इतर पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार अतिशय श्रेष्ठ आहे असे मत सत्कारमूर्ती सचिन धोकटे, प्रकाश पाटील, सोमनाथ पेशवे यांनी सांगितले व सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांच्या हातून घेताना अत्यंत आनंद झाला असे सांगितले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिवय्या स्वामी, भक्तगण महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रविराज शेटे यांनी तर आभार सिद्धेश्वर झाडबुके यांनी मानले.



No comments