Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत माजी सोसायटी चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष गणपत पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

 विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत माजी सोसायटी चेअरमन  तंटामुक्ती अध्यक्ष गणपत पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.




वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे  १८ वर्ष विकास सेवा सोसायटी चेअरमन पद , माणकेश्वर दूधडेरीचे वीस वर्षे चेअरमन पद, वाटंबरे ग्रामपंचायत सदस्य व  गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशी राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध पदे भुषविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक व सर्वच पक्षातील नेत्यांशी सलोक्याचे संबंध  असणारे  गणपत नामदेव पवार  यांचा मंगळवारी दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सांगोला तालुक्यातील  मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात त्यांच्या घरी संपन्न झाला . 

या अभिष्टचिंतन सोहळ्याला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला महाविद्यालयाचे  संस्थापक बाबुरावजी गायकवाड, युवा सेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सागर पाटील, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष गुंडा दादा खटकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, उद्योजक योगेश खटकाळे , उद्योजक संतोष चोथे , ग्रामसेवक एस, आर ,मोहिते वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष, आजी,माजी सोसायटी चेअरमन ,विविध पक्षाचे नेते, विविध पक्षातील  सेलचे  पदाधिकारी तसेच गावातील सर्व मान्यवर व  मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते .

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा गणपत पवार यांच्या कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला .


यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व बाबुराव गायकवाड यांनी गणपत पवार यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.या  वेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व ग्रामस्थां साठी पवार कुटुंबीयांच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart