Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

"आमदार आपल्या दारी" या गाव भेट दौऱ्यात सुटणार वाटंबरे करांच्या अडचणी.

 "आमदार आपल्या दारी" या गाव भेट दौऱ्यात सुटणार वाटंबरे करांच्या अडचणी.



{खंडोबा देवस्थान येथे गुरुवारी दुपारी बारा वाजता ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने आव्हान}

वाटंबरे/प्रतिनिधी: गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी "आमदार आपल्या दारी" या गावभेट  दौऱ्यानिमित्त सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील तसेच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील ,ज्येष्ठ नेते प्रबुध्दचंद्र झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, भाजप तालुका अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  सर्वसामान्यांच्या विविध  अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी  शासकीय अधिकारी  तहसीलदार अभिजीत पाटील ,गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी ,कृषी विकास अधिकारी शिवाजी शिंदे हे सर्व शासकीय अधिकारी  उपस्थित राहणार आहेत .


तरी वाटंबरे येथील सर्व ग्रामस्थांनी गुरुवारी बारा वाजता खंडोबा देवस्थान येथे उपस्थित राहण्याचे आव्हान वाटंबरे ग्रामपंचायत यांच्या वतीने  ग्रामस्थांना करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart