लाव रे तो फोन या चर्चेनंतर "आमदार आपल्या दारी "गावभेट दौऱ्याच्या संकल्पनेची सांगोला तालुक्यात चर्चा.
{आमदार आपल्या दारी गाव भेट दौरा वाटंबरे येथे मोठ्या उत्साहात संपन्न }
वाटंबरे/प्रतिनिधी: कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला सांगोला तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी "लावरे तो फोन" खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फोनची चर्चा संपते ना संपते तोपर्यंत तालुक्यात "आमदार आपल्या दारी" या गाव भेट संकल्पनेची चर्चा सर्व तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमधून सुरू आहे. गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी अकोला,वासूद ,
कमलापर ,गोडसे मळा ,वाटंबरे ,अजनाळे, मंगेवाडी या गावभेट दौऱ्या दरम्यान वाटंबरे या ठिकाणी "आमदार आपल्या दारी" उपक्रमा अंतर्गत गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार शहाजीबापु पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील यांनी गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्याच्या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेभाऊसाहेब रुपनर, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत या नेत्यांच्या सोबत तहसीलदार अभिजीत पाटील, नायब तहसीलदार बडवे साहेब, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महावितरणचे उपअभियंता आनंदा पवार, मेनकुदळे, गटशिक्षणाधिकारी नाळे , उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुळगीर साहेब, उप अभियंता लघु पाटबंधारे खरात साहेब उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कमळे साहेब, शाखा अभियंता आर,टी,तंबाके साहेब, शाखा अभियंता खंडागळे साहेब,शाखा अभियंता महेश साठे, मंडल अधिकारी पोकळे हे शासकीय अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या वेळी उपस्थित होते
.
यावेळी बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले की, "नीरा देवधर धरणात सांगोल्याचा समावेश व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. आत्ता तालुक्यासाठी एक टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार असल्यामुळे नीरा उजवा कालव्याला भरपूर पाणी मिळणार आहे. उजनीचेही दोन टीएमसी पाणीही आपल्याला मिळणार असून यापुढे शेतीसाठी पाणी व योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही." असे आमदार शहाजीबापु पाटील यांनी यावेळी उपस्थितांना ग्वाही दिली.
माजी आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील म्हणाले की, 'गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधिक निधी यावेळी तालुक्याला मिळाला आहे. आता कामांसाठी निधी कमी पडणार नाही. कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. तालुक्याचा दुष्काळ हा कलंक निश्चितपणे मिटेल.' आम्ही कामांसाठी नेहमी तत्पर असेन .
आमदार आपल्या दारी या गाव भेटीदरम्यान आमदार शहाजी बापू पाटील ,दीपक आबा साळुंखे पाटील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर व भाजपचे नेते चेतन सिंह केदार सावंत व शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार, उपसरपंच मोनिका निकम तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी आबा, बापू आणि सर्व उपस्थित मान्यवरांसमोर आपाल्या अडचणी मांडल्या यावेळी बापू आणि आबांनी संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या तक्रारीचे निवारण केले. यावेळी ग्रामपंचायत यांच्या वतीने आबा आणि बापूंना गावातील मूलभूत विकास कामासंबंधी निवेदन देण्यात आले.
या गावभेटी दौऱ्यावेळी भाजप नेते चेतनसिंह केदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.
या गाव भेट दौऱ्यावेळी वाटंबरे गावातील शासकीय कर्मचारी ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी , गाव कामगार तलाठी बाळासाहेब शिंदे , कृषी सहाय्यक शिंदे ,आरोग्य सेवक रजाक मुल्ला, आरोग्य सेविका ढावरे, पशुवैद्यकीय डॉक्टर फुले, पोलीस पाटील पांडुरंग पवार तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच वाटंबरे गावातील सर्व आजी ,माजी ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी सोसायटी चेअरमन, आजी माजी तंटामुक्ती अध्यक्ष , विविध संस्थेचे पदाधिकारी ,गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच आपल्या समस्या आबा आणि बापूसमोर मांडण्यासाठी वाटंबरे गावातील मोठ्या प्रमाणावर नागरिक या गाव भेटीदरम्यान उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आभार प्रदर्शन हणमंत निकम सर यांनी केले.
या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शासकीय अधिकारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांसाठी वाटंबरे ग्रामपंचायत यांच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा