Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

वाटंबरेकरानी ग्रामसेवक एस, आर, मोहिते यांना निरोप देत ग्रामसेवक मेटकरी यांचे केले स्वागत.

 वाटंबरेकरानी ग्रामसेवक एस, आर, मोहिते यांना निरोप देत  ग्रामसेवक मेटकरी यांचे केले स्वागत.


{ग्रामसेवक एस, आर, मोहिते यांना निरोप देताना ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू}


वाटंबरे/प्रतिनिधी:जून २०१८ मध्ये वाटंबरे गावचा पदभार स्वीकारला पाच वर्षाच्या कालावधीमध्ये गावची विकास कामे करत असताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले, गावच्या विकासात गावाला स्वच्छ पाणी, मुबलक पाणी, दिवाबत्तीची सोय आरोग्याच्या असणाऱ्याच्या सर्व सुविधा देण्याचे प्रयत्न केले, गावाला पायाभूत सुविधा अंतर्गत रस्त्याच्या असणारी कामे तसेच शासनाने दिलेला निधी कामासाठी खर्च करणे .कोविड सारख्या कालावधीत सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या प्रशालेत कोविड सेंटर उभारून आरोग्य सेवक , डॉ.घाटुळे याना बरोबर घेऊन २७० कोविड रुग्णांना विना मोबदला उपचार करून त्यांच्या घरी सोडले ,या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काम करत असताना माझ्याकडून कोण दुखावले गेला असता तर मला माफ करावे तसेच वाटंबरे करानी जे प्रेम दिले ते असेच शेवटपर्यंत राहू द्या असे एस ,आर, मोहिते यांनी आपल्या निरोप समारंभ प्रसंगी म्हटले.


सांगोला तालुका वाटंबरे येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक एस ,आर मोहिते यांची तालुक्यातील पारे या ठिकाणी बदली झाल्याने ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या वतीने दि. २७ जानेवारी शुक्रवारी त्यांचा निरोप समारंभ सत्कार घेण्यात आला तसेच त्या ठिकाणी रुजू झालेले ग्रामसेवक मेटकरी यांचा सत्कार या कार्यक्रमा प्रसंगी घेण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच किरण पवार यांच्या हस्ते ग्रामसेवक एस, आर, मोहिते यांचा सत्कार करण्यात आला तसेच रुजू झालेले ग्रामसेवक मेटकरी यांचाही सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी यावेळी ग्रामसेवक मोहिते व ग्रामसेवक मेटकरी यांचा सत्कार केला.


या सत्कार समारंभा नंतर वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार, जलतज्ञ मधुकर पवार सर ,माजी सरपंच नामदेव पवार सर, समाजसेवक महादेव बापू पवार, नियोजन समिती सदस्य विजय पवार, पत्रकार तंटामुक्ती उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी यावेळी आपले मनोगते व्यक्त केली.

या निरोप समारंभ प्रसंगी गावचे सरपंच किरण पवार, उपसरपंच मोनिका निकम तसेच सर्व ग्रामपंचायत आजी माजी सदस्य , आजी माजी तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष, आजी माजी माजी सोसायटी चेअरमन ,गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच  गावातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते.

ग्रामसेवक एस,आर, मोहिते यांना निरोप देताना वाटंबरे ग्रामपंचायत  कर्मचारी यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart