Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

नाझरे येथे मन्मथ स्वामी यांची जयंती व कोळेकर महास्वामीजी यांचा वाढदिवस साजरा*

 **नाझरे येथे मन्मथ स्वामी यांची जयंती व कोळेकर महास्वामीजी यांचा वाढदिवस साजरा


नाझरे प्रतिनिधी

                      नाझरे तालुका सांगोला येथील वीरभद्र मंदिर येथे मन्मथ स्वामी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन रविराज शेटे व योगिता शेटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कोळेकर महास्वामींच्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, फेटा बांधून महास्वामींचे अभिष्टचिंतन करण्यात आले.


           सदर प्रसंगी महिला भजनी मंडळाचे भजन व मन्मथ स्वामी व महास्वामींच्या कार्याविषयीची माहिती सेवानिवृत्त शिक्षक शिवाय स्वामी यांनी दिली. तसेच परमरहस्य ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे व वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी सोहळा व मन्मथ स्वामी जयंती म्हणजे या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे असे कोळेकर महास्वामीजी यांनी सांगितले. यावेळी शिक्षक नेते अशोक पाटील, रविराज स्वामी, संजय रायचुरे, रमेश शिरदाळे, शिवाजी स्वामी, माजी सरपंच महालिंग पाटील, राजू खोकले, सुभाष पाटील, शरद स्वामी, दत्तात्रय पाटील, भारत पाटील, बापू पाटील, महिला, भक्तगण उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart