Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

संबंधितावर योग्य ती कारवाई करणार असे आश्वासन मिळाल्यानंतर मोहसीन मुलांनी यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

 सांगोला भूमी अभिलेख कार्यालय मधून मिळकत पत्रिकेमध्ये अपरातफर करीत बेकायदेशीर क्षेत्रवाढ केलेल्या संबंधितावर योग्य ती कारवाई करणार असे आश्वासन मिळाल्यानंतर मोहसीन मुलांनी यांचे उपोषण तात्पुरते स्थगित 




सांगोला भुमिअभिलेख कार्यालयाच्या अंधाधुंदी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोहसीन मुलानी यांचे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सांगोला शहरातील सिटी सर्वे नंबर 1975 या मिळकत पत्रिकेमध्ये कायमस्वरूपी 48.20 चौरस मीटर अशी जागेची नोंद असताना या कार्यालयातून अनाधिकृतपणे व गैर मार्गाने खाडाखोड करून या मिळकत पत्रिकेमध्ये अफरातफर करून ७८.२० चौरस मीटर अशी चुकीची व आपल्या अधिकाराच्या गैरफायदा घेत येथील अधिकारी, कर्मचारी वर्गांनी काही बाहेरील लोकांसोबत हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक वाटाघाटी करून ही खाडाखोड करून क्षेत्रवाढ करण्यात आलेली आहे का? एका शासकीय कार्यालयातील नागरिकांच्या मिळकती व महत्त्वाची दस्तऐवज सांभाळून ठेवण्याचे काम हे त्या कार्यालयाचे येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाची असताना या कार्यालयातून ही खाडाखोड होती तरी कशी? आणि ही खाडाखोड करून क्षेत्रवाढ झाल्यानंतर तक्रारदार मोहसीन मुलानी यांनी या कार्यालयातील उपाधिक्षक यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील उपाधिक्षक यांनी मान्य व कबूल लेखी स्वरूपात दिल्यानंतर या गंभीर घटनेची दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करणे महत्त्वाचे असताना मात्र या भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधिक्षक हे मात्र वेळ काढूपणा करीत फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत आहेत. आणि सांगोला पोलीस स्टेशन यांना गुन्हा दाखल व्हावे अशी विनंती अर्ज करीत फक्त पत्रव्यवहार करीत आहेत. 


मात्र अशा गंभीर घटनेची व गुन्हा दाखल हा फक्त पत्रावरती होत नाही हे या अधिकाऱ्यांना माहित नसावे का? का फक्त हे चालढकलपणा करण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या सर्व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोहसीन मुलांनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारताच्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करीत या घटनेची तात्काळ क्षेत्रवाढ केलेल्या त्या कार्यकाळातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन संबंधीतावर गुन्हा दाखल व्हावा अशी तीव्र मागणी या उपोषणामध्ये करण्यात आली. या घटनेची  लवकरात लवकर व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेमण्यात आलेले तहसीलदार बनसोडे यांनी उपोषण कर्ते मोहसिन मुलांनी यांना दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart