समुहगीतगायन व इतर स्पर्धेत वाटंबरे शाळेचे उल्लेखनीय यश.
{जि. प. प्रा. केंद्र शाळा वाटंबरे येथे केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा संपन्न}
वाटंबरे येथील माणकेश्वर दत्त मंदिरात झालेल्या केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदवून यश प्राप्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी समुहगीत गायन स्पर्धेत वाटंबरे केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला.
तर चित्रकला स्पर्धेत आदिती साळुंखे या विद्यार्थ्यीनीने केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच वक्तृत्व स्पर्धेत रसिका गेजगे हिने केंद्रात तृतीय क्रमांक मिळविला.
गीतगायन साठी पांडुरंग कोकरे सर यांनी हार्मोनियमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साथ दिली तर खंजिरी साथ नितीन गवळी सर यांनी केली.
या विद्यार्थ्यांनी वाटंबरे शाळेतील शिक्षक पांडुरंग कोकरे सर ,अरूण मासाळ सर,तेली मॅडम ,मिसाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त केले .
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच वाटंबरे गावातील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा