सांगोला तालुका भाजपा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड.
सांगोला तालुका भाजप अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याने झाल्यने त्यांच्यावर सांगोला शहर आणि तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चेतनसिंह केदार हे विद्यमान भाजपाचे तालुका अध्यक्ष असून सांगोला नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. भाजपाची तालुक्यातील बुध यंत्रणा सक्षम करत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबरीने घेऊन काम करत भाजप पक्ष सांगोला तालुक्यामध्ये मजबूत करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन त्यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा