Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

ग्रामपंचायत वाटंबरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

 ग्रामपंचायत वाटंबरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.



सांगोला तालुका वाटंबरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक महादेव बापू पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महादेव बापू पवार यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.


या जयंतीस वाटंबरे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रवीण पवार, सदस्य नामदेव पवार, शिवाजी माळी, तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार, जलतज्ञ मधुकर पवार ,तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार, जेष्ठ नागरिक नारायण पवार, उमेश गायकवाड, धीरज पवार, दादासाहेब जाधव, पांडुरंग पवार, शिवाजी लेंडवे, दिनेश धनवडे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart