मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दावल इनामदार तर कार्याध्यक्ष पदी विजय भगरे.
![]() |
| दावल इनामदार |
मंगळवेढा (प्रतिनिधी) ः येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक पत्रकारदिनी संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली होवून नुतन अध्यक्षपदी दै.सकाळचे दावल इनामदार तर कार्याध्यक्षपदी दै.दामाजी एक्सप्रेसचे विजय भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
![]() |
| विजय भगरे |
सुरूवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नुतन अध्यक्ष व इतर कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी महेश वठारे, सचिन हेंबाडे, अमिर आतार, सचिवपदी वासुदेव जोशी, खजिनदारपदी म्हाळाप्पा शिंदे, सहसचिवपदी रोहीदास भोरकडे, सहखजिनदारपदी प्रसाद कसबे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुनिल कसबे यांची ही निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, अॅड.दत्तात्रय तोडकरी, बाळासाहेब नागणे, अबुबकर सुतार, श्रीकांत मेलगे, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, बाबासाहेब सासणे, औदुंबर ढावरे, ज्ञानेश्वर भगरे, मोहन माळी, समाधान फुगारे, केशव जाधव यांचेसह भिमराव मोरे, विलास मासाळ, राजेंद्रकुमार जाधव, प्रशांत माळी, विलास काळे, प्रविण गांडुळे, अविनाश मेटकरी, रामा सपताळे, दत्तात्रय कांबळे, अक्षय पवार, दादा लवटे, सुरेश केंगार, महादेव वाघमारे, बापु मासाळ, संतोष मिसाळ, शंकर सपताळे, दयानंद माळी, दिगंबर गरंडे, लक्ष्मण नागणे, प्रतिक भगरे, बालाजी टुले, लखन कोंडुभैरी व मारूती गरंडे आदि उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा