मा. दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाटंबरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने सर्व शाळेत खाऊ वाटप.
वाटंबरे / प्रतिनिधी :
सोलापूर जिल्ह्याचे नेते मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाटंबरे यांच्या वतीने वाटंबरे येथील सर्व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तालुका नियोजन समितीचे सदस्य विजय पवार, माजी पंचायत समिती सदस्य बिरा साहेब गेजगे, ज्येष्ठ नेते महादेव बापू पवार ,रामभाव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्रीधर पवार, उमेश गायकवाड,बंडू पवार ,लहू पवार, नारायण पवार, माणिक पवार, आप्पासाहेब गेजगे, पांडुरंग गेजगे ,राजू पवार,बबन पवार, अविनाश पाटोळे, तसेच मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या खाऊ वाटपावेळी उपस्थित होते.
या खाऊ वाटपा वेळी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा