Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ८ जानेवारी, २०२३

जि. प. प्राथमीक शाळेस पत्रकारांचे योगदान मोलाचे: शिक्षण विस्तार अधिकारी सुयोग नवले.


 जि. प. प्राथमीक शाळेस पत्रकारांचे योगदान मोलाचे: शिक्षण विस्तार अधिकारी सुयोग नवले.




{जि. प. प्रा. केंद्र शाळा वाटंबरे येथील शाळेत पत्रकार दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये केले वक्तव्य}



वाटंबरे/प्रतिनिधी:

जि. प .प्राथमीक शाळेस पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे, सध्या स्पर्धेच्या युगात शाळा टिकवण्यासाठी पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले असून यापुढेही असेच त्यांचे सहकार्य रहावे असे शिक्षण विस्तार अधिकारी सुयोग नवले यांनी  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथील पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये वक्तव्य केले तसेच त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

६ जानेवारी दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा केला जातो वाटंबरे येथे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच मोनिका निकम उपस्थित होत्या शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी सुयोग नवले तसेच सर्व पत्रकार बांधव व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे नूतन तालुका अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले जिल्हा परिषद शाळांनी सामाजिक , शैक्षणिक  उपक्रम राबवावे त्या कार्यक्रमाचे आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्ध करू तसेच यावेळी त्यांनी मला दिलेल्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करू असे म्हटले.

यावेळी महादेव बापू पवार यांनी मनोगत मध्ये पत्रकारांनी समाजातील वंचित, उपेक्षित अशा सर्व घटकांच्या आवाजाच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी आवाज उठवण्याचे आव्हान करत त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, पत्रकार दत्तात्रय पवार यांनी केले यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थी , उपस्थित असलेल्या  सर्व मान्यवरांना  बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना पत्रकार दिनाचे महत्त्व पटवून देताना पत्रकारांच्या अस्त्र असणारे लेखणीमुळे त्यांनी विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले  जेणेकरून या विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकार होवुन उपेक्षित, अडाणी ,वंचित अशा वर्गांना न्याय देण्याचे काम करावे असे म्हटले .

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे नवीन नियुक्त झालेल्या सर्व पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला, तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वही आणि पेन चे  वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख काझी सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय खंडागळे, तरुण भारत पत्रकार दीपक भाकरे, मीनाज खतीब ,दैनिक किर्णोद्य चे संपादक किशोर म्हमाणे, आनंद दौंड , सीबीएस न्यूज चे संपादक चांद भाई शेख , पत्रकार शेटे सर,एस 24 चे संपादक सिद्धेश्वर माने, पत्रकार शशिकांत कोळी, पत्रकार संतोष बनसोडे, उपसरपंच मोनिका निकम, सोसायटी चेअरमन नाना बापू पवार, जलतज्ञ मधुकर पवार सर,नियोजन समिती तालुका सदस्य विजय पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार, वाटंबरे गावचे ज्येष्ठ नागरिक महादेव बापू पवार ,तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू मुरलीधर पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भाग्यवान पवार, शिंदे वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीधर पवार, उमेश गायकवाड, संजय पवार, रामचंद्र पवार, धनाजी पवार, अविनाश पाटोळे,  बाळासाहेब धनवडे, हनमंत निकम सर, धीरज पवार, सोनू निकम,तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ व पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर साळुंखे सर व आभार प्रदर्शन पत्रकार नंदकुमार गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शिक्षक कोकरे सर व मासाळ सर यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart