प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व गावठाण अंगणवाडी यांच्यावतीने जागतिक बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाटंबरे व गावठाण अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने वाटंबरे येथे दिनांक २४ जानेवारी २०२३ मंगळवारी जागतिक बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या बालिका दिनासाठी अंगणवाडी शाळेमध्ये लहान मुली वेशभूषा करून आले होते यावेळी पालक वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या वेळी आरोग्य सेविका दिपाली ढावरे यांच्याबरोबर प्रार्थनेच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी बालविवाहाच्या विरोधात शपथ घेतली.
उपस्थित पालक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मदतनीस व विद्यार्थिनी "बेटी पढाव बेटी बचाव" चा नारा देत गावातून प्रभात फेरी काढली .
या जागतिक बालिका दिनासाठी आरोग्य सेवक रज्जाक मुल्ला, आरोग्य सेविका दिपाली ढावरे, अंगणवाडी सेविका राजाक्का पवार, शर्मिला पवार, मदतनीस मैना भंडारे, सुनंदा माळी आशा वर्कर दिपाली पवार, संगीता पवार तसेच मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग यावेळी उपस्थित होता.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा