तीळगुळ वाटपाच्या कार्यक्रमातून शिक्षकांनी साधला महिला पालकांशी संवाद.
{जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरेचा स्तुत्य उपक्रम}
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे ने शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांशी संवाद साधण्यासाठी अनोखा असा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कुटुंबात त्याच्या आईचा मोठ्या प्रमाणात वाटा असतो त्या मुळे शाळेने महिला पालकांसाठी त्यांच्या शाळेमध्ये तिळगुळ वाटप,हळदी कुंकू , संगीत खुर्ची व उखाण्याचा कार्यक्रम आयोजित करत या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महिला पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी अडचणी जाणून घेत व त्या अडचणींवर मात करण्यासाठी पालक व शिक्षक यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सर्वानुमते ठरले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाटंबरे गावच्या उपसरपंच मोनिका निकम व प्रमुख पाहुणे म्हणून वाटंबरे गावच्या माजी उपसरपंच रेखा पवार होत्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांनी शाळेने पालक व शिक्षकांचा सुसंवाद घडवण्यासाठी महिला पालकांना शाळेत येण्यासाठी जो उपक्रम राबविला त्या उपक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांनी कौतुक करत शाळेने अशीच भविष्यात प्रगती करावी असे म्हटले. यावेळी घेण्यात आलेल्या उखाणा व संगीत खुर्ची मधील विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका बनाबाई पवार मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका तेली मॅडम यांनी केली
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोकरे सर व मासाळ सर यांचे त्याना मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा