Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महूद येथे नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.

 संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महूद येथे नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.



 सांगोला तालुका महूद बू! येथे

दि.२० जानेवारी २०२३ शुक्रवारी  "संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य" सोलापूर जिल्हा चे उपाध्यक्ष आर्यन नरळे  व रोहन येडगे या युवकांनी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. 

या शिबिरास महुद परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . या शिबिरत १०० हून अधिक नागरिकांनी त्यांची नेत्रतपासणी केली व २०  नागरिकांचे ऑपरेशन मोफत करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी  दिली तरी सदर रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया पुणे येथे " बुधराणी हॉस्पिटल " तर्फे मोफत करण्यात येणार आहे.तसेच रुग्णांना मोफत जाणे व येणे व तेथील राहण्याची सोय ही मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकाने दिली .या शिबिरास गावचे सरपंच,उपसरपंच,विविध पक्षांचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आयर्न नरळे व रोहन येडगे या तरुणांनी केलेले या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart