वारंवार ग्रामसभा कोरम अभावी पूर्ण न होणे बिनविरोध वाटंबरे ग्रामपंचायतिचे अपयश कि ग्रामस्थांची बेफिकिरी?
भाग्यवान पवार
{सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान पवार यांनी केला प्रश्न उपस्थित}
वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाटंबरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली. गुरुवार दि. २६ जानेवारी नियोजित असलेल्या या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला अवघ्या ६५ लोकांनी हजेरी लावल्याने ही ग्रामसभा तहकूब करावी लागली आपल्या गावची विकासाची दिशा ठरवायची असेल तर त्याबाबत निर्णय हे ग्रामसभेत घेतले जातात. अनेक लोक ही ग्रामसभा केव्हा होणार याकडे डोळा लावून बसलेले असतात; मात्र गेल्या काही दिवसापासून ग्रामसभा ही राजकीय नेत्याच्या कुस्त्याचा आखाडा बनले आहे. अनेक राजकीय पुढारी या ग्रामसभेच्या निमित्ताने एकमेकांवर चिखल फेक करत असतात एकमेकांची उणी धुनी काढत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी विकासावर चर्चा होण्यापेक्षा कोण किती भांडले आणि कोण किती तोऱ्यात होता? याबाबतची चर्चा जास्त रंग असते. त्यामुळे आता अशा ग्रामसभांकडे ग्रामस्थ लोक फिरकेनासे झाले आहेत. अजेंड्यावरील विधेयाका पेक्षा लोक स्वतःला अपेक्षित विषय घेऊन ग्रामसभेमध्ये वाद घालतात आणि अजिंठ्यावरील विषय बाजूला राहतात. त्यामुळे ग्रामसभेत अनेक वेळा वाद होतात ग्रामसभेला किमान १०० लोक उपस्थित राहणे आवश्यक असते ; मात्र तेवढी गणसंख्या सुद्धा या ग्रामपंचायतीला गाठता आली नाही. आता याला बिनविरोध ग्रामपंचायतीचे अपयश म्हणायचे? की ग्रामस्थांची बेफिकिरी? मात्र अशा प्रकारे कारभार होणार असेल तर गावचा विकास कसा होणार? याबाबतची शंखा निर्माण होत आहे. या ग्रामसभेला आलेल्या काही लोकांनी ग्रामसभा न झाल्याने अखंड तांडव केले पण त्या ग्रामसभेला अपेक्षित गणसंख्या आणणे हे सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. किंवा या ग्रामसभेला येणे हे सर्वच ग्रामस्थांचं कर्तव्य आहे. मात्र केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ग्रामसभा उधळून लावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे ग्रामस्थ ही आत्ता अशा ग्रामसभा कडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक वेळ आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वाटंबरे ग्रामपंचायत ही बिनविरोध करताना खंडोबाच्या मंदिरामध्ये केली गेली व खंडोबाच्या साक्षीने असे ठरवण्यात आले की प्रत्येक वर्षीचा ग्रामपंचायतचा विकासाचा आराखडा प्रत्येक वार्डाच्या सदस्याने याच मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी केलेल्या कामाचा व चालू असलेल्या कामाबाबत माहिती देण्याचे सर्वांमुते ठरले होते गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली होती. परंतु ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचे काम नागरिकांना दिसत नसल्याने किंवा त्यांच्या तक्रारीचे निरसन न झाल्याने अनेक नागरिक या ग्रामसभेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र या माध्यमातून दिसत आहे असे मला वाटते.तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब झालेली होती तरी येणाऱ्या ग्रामसभेला सर्व नागरिकांना उपस्थित राहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान पवार यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा