Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, २२ जानेवारी, २०२३

ग्रामपंचायत वाटंबरे येथे सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 ग्रामपंचायत वाटंबरे येथे सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


सांगोला तालुका वाटंबरे येथे सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले


 त्यानंतर सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन वाटंबर गावचे आरोग्य सेवक डॉक्टर मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावचे जलदूत मधुकर पवार सर यांनी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. या जयंतीस वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार, सदस्य नामदेव पवार, शिवाजी माळी, जलतज्ञ मधुकर पवार , माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार,तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू मुरलीधर पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीकदादा पवार,उमेश गायकवाड,  पांडुरंग पवार, धनाजी पवार, पप्पू पवार तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart