Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरेचे सुयश. {शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक

 तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरेचे सुयश.

{शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न}



वाटंबरे/प्रतिनिधी: सांगोला येथील पुजारवाडी शाळेत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास (टॅलेंट हंट) स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे ने गीत गायन स्पर्धेत लहान गटात द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वर्ग से सुंदर देश हमारा या गीताला शाळेतील शिक्षक  पांडुरंग कोकरे सर यांनी हार्मोनियम  तर  सुधाकर कुंभार सर यांनी तबला व नितीन भोसले सर यांनी ट्रीपल साथ दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार तंटामुक्ती अध्यक्ष  भारत पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वाटंबरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार यांचाही सत्कार यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  दत्तात्रय पवार यांच्या वतीने करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिग्विजय पवार यांनीही विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.


 शाळेतील मुख्याध्यापिका  तेली मॅडम, पवार मॅडम, मासाळ सर ,केंद्रप्रमुख काझी सर यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart