Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बिलावल भुट्टोच्या विरोधात सांगोला भाजपने नोंदविला निषेध.

 बिलावल भुट्टोच्या विरोधात सांगोला भाजपने नोंदविला निषेध.



{चेतनसिंह  केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बिलाल भुट्टोच्या विरोधात सांगोला भाजप झाली आक्रमक}



पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सांगोल्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून भुट्टोचा निषेध केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, बिलावल भुट्टो याचा धिक्कार असो अशा घोषणा देत भुट्टोची प्रतिमा जाळून तीव्र निषेध नोंदवला.


        यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, दुर्योधन हिप्परकर,विजय इंगोले, प्रविण जानकर, अनिल वाघमोडे, वसंत सुपेकर, संजय गव्हाणे, शिवाजी ठोकळे, सुरेश बुरांडे, संजय केदार, सोयजित केदार,  विश्वास कारंडे, राहुल केदार, ओंकार कुलकर्णी, सचिन केदार, बालाजी केदार, मानस कमलापूरकर, नरेश बाबर,विष्णू हिप्परकर,हनी करपे, लक्ष्मीकांत लिगाडे, भालचंद्र भंडारे, रोहित सावंत, साहेबराव पाटील, समाधान भालके, सर्जेराव करडे,ऋषी यलमार,रामभाऊ करडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments