Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ४ जुलै, २०२६

सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*

 *खिलारवाडी-हलदहिवडी 4.5 किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*  


*सात कोटींच्या निधीतून सहा गावांना होणार मोठा लाभ*



*सांगोला* : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी दरम्यानच्या 4.50 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.


सुमारे *7 कोटी रुपये* खर्चाच्या या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विशेष आग्रहावरून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


*6 गावांना थेट फायदा*

या रस्त्यामुळे फक्त खिलारवाडी आणि हलदहिवडीच नव्हे, तर *गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी* या एकूण सहा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


रस्ता झाल्याने शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे. तसेच या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होणारी *दूध आणि ऊसाची वाहतूक* देखील आता कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकणार आहे.


*शहाजी बापूंचे आश्वासन*

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले,  

_"खिलारवाडी आणि माझे जीवनाशी निगडीत जवळचे संबंध आहेत. गेली अनेक वर्षे राजकारण ते समाजकारणाच्या क्षेत्रात येथील लोकांनी मला मोठ्या ताकतीने पाठिंबा दिला आहे. मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायमचा आग्रही राहीन. राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी लवकरात लवकर निधी आणून सर्व कामे पूर्णत्वास नेईन."_


याचबरोबर त्यांनी या भागातील *पाण्याच्या कॅनॉलचा फाटा लवकरच कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे* आश्वासनही दिले.


*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*

या भव्य कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य *दादासाहेब लवटे*, पंचायत समिती सदस्य *बाळासाहेब बंडगर*, *उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील, ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले* यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart