सांगोला/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित शासकीय प्रश्नांना गती मिळावी आणि त्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, या उद्देशाने सोलापूर शहरात “सेवा अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षका च्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. संतोषजी साखरे यांनी उपस्थित शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, प्रलंबित शासकीय कामे आणि अपेक्षा जाणून घेतल्या. अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून शिक्षक व पदवीधरांना न्याय मिळवून देणे, हाच या “सेवा अभियानाचा” मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश संयोजक डॉ प्रशम कोल्हे सर,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोक बबनराव उकिडे, पुणे विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.नारायण राजुरवार मा. आमदार भगवानराव साळुंखे , भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.शशिकांत चव्हाण, विक्रमजी देशमुख ,प्रा.डॉ रोंगे सर, प्रा सुरेशजी गुंड,प्रा प्रशांत शिंपी ,सरचिटणीस आमोल साखरे,दत्ता पाटील प्रा.संजय टोम्पे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा