आ. गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप
आ. गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप.
वाटंबरे /प्रतिनिधी:
स्व. डॉ गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील घरकुल वाडी वस्ती वरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारती उभ्या राहिल्या असुन त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते ते लक्षात घेऊन वाटंबरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेतुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी सरपंच नामदेव पवार, नामदेव पवार, प्राध्यापक मिलिंद पवार, नारायण पवार, काशिनाथ पवार,सुरेश पवार ,अमर केदार ,अक्षय पवार मोठ्या प्रमाणावर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व सर्व शाळेतील शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.



No comments