वक्तृत्वाने सर्वांगीण विकास सहज शक्य : डॉ. रवींद्र आरळी
(समर्थ संस्थेची जत येथे वक्तृत्व व संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न)
जत:समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थे मार्फत 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत 'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण व समारोप समारंभ गंगाबाई गोब्बी शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय जत येथे जत चे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या शुभहस्ते व उपस्थित संपन्न झाला.या उपक्रमाचे कौतुक करून महिलांना राजकीय क्षेत्रात यापुढे आरक्षणामुळे प्रचंड संधी असून त्यांनी आता वक्तृत्व कला शिकून आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावे. वक्तृत्वातून सर्वांगीण विकास सहज शक्य असून, कुशल वक्तृत्वाची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य सेवा मंचचे उपाध्यक्ष माणिक कोडक सर यांनी वक्तृत्वाची कार्यशाळा हि काळाची गरज आहे, बोलण्याने प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षेत्रात यश मिळवणे सोपे जाईल, समर्थ संस्थेने यापुढे असे उपक्रम राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविकामध्ये दिगंबर साळुंखे सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेचा कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला.यूट्यूब स्टार व ट्रेनर अनिल बन्ने फक्त बोलण्याच्या कौशल्यावर आम्ही दोन यूट्यूब चैनल चालवतो जत मध्ये सर्वात जास्त सबस्क्राईब चा सन्मान आम्हाला मिळाला. प्रशिक्षक मनीष काळे देशमुख यांनी महाराष्ट्रात दहाहजार पेक्षा जास्त वक्ते तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी साहित्य सेवा मंच जतचे नूतन अध्यक्ष लवकुमार मुळे, उपाध्यक्ष माणिक कोडग सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लवकुमार मुळे यांनी साहित्य क्षेत्रात वक्तृत्व हा एक पाया असून सादरीकरणासाठी कुशल वक्तृत्व महत्वाचे असल्याचे नमूद केले.
या कार्यशाळेस नगरसेविका संगीता सोनुले,नयना सोनवने, सुषमा सुर्वे,मनीषा साळे,माधुरी पाटील, स्वाती बडचिकर,अभिलाषा कोडग, मयुरी सावंत,राजश्री उबाळे,मुस्कान नदाफ, योजना वाघमारे यांच्यासह प्रशिक्षणार्थी नी सहभाग नोंदविला. यांना प्रमाणपत्र मेडल व ट्रॉफी चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका नम्रता सूर्यवंशी मॅडम व आभार समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.सुर्वे,राजू कोळीसो, हेमंत भोसले, लोखंडे सर, व्यंकटेश राठोड सर, चव्हाणसो, डॉ. सतीश येलपले, भोसले सर, अरुण अरळी, प्रवीण निगडी यांच्यासह जतवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा