Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

भो जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर

भो

जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर

*भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात पालकांनी अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांच्या कार्याचा केला गौरव 

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी गावांतर्गत भोजलिंगवाडी ( रानमळा) अंगणवाडी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम हा उल्लेखनीय व गौरवास्पद ठरला आहे. या अंगणवाडी शाळेच्या सेविका मनीषा खळगे व मदतनीस सानिका जावीर यांनी विद्यार्थ्यावरती उत्कृष्ट प्रकारचे संस्कार करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी केलेली तयारी महत्त्वाची ठरली आहे. लहानपणी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक- शिक्षका यांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांसाठी लहानपणीच्या संस्काराची शिदोरी जीवनभर उपयुक्त ठरते. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार कौतुकास्पद आहेत असे मौलिक विचार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. 

शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी प्रमुखपाहुणे म्हणून अमोल बाबर बोलत होते . 
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पत्रकार दशरथ बाबर तसेच विद्यार्थ्यांचे पालक व युवावर्ग उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मनीषा खळगे, मदतनीस सानिका जावीर तसेच चोपडी गावातील अलका बाबर, सविता चौगुले, विजया मेखले, पुनम जवंजाळ, शोभा जवंजाळ, ताई जावीर, सविता बाबर, उषा बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राहुल बाबर, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर बाबर, आगतराव चव्हाण, प्रताप बाबर, अमोल बाबर ,आकाश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देत कौतुक केले .
या कार्यक्रमप्रसंगी पहिलीसाठी दाखल पात्र मुलांना प्रमुखपाहुणे अमोल बाबर यांच्या हस्ते विद्यारंभ प्रमाणपत्र देण्यात आले." गुढीपाडवा पट वाढवा "या उपक्रमांतर्गत हे प्रमाणपत्र देण्यात आले. तीन वर्षाच्या मुलांचा स्वागतोत्सव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवसही केक कापून साजरे करण्यात आले. पालकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत लावणी, शालेयगीत, भावनिकगीत, लोकनृत्य, सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उलका निकम मॅडम यांनी केले. आकाश वाघमारे यांनी या कार्यक्रमासाठी मोफत साऊंड सिस्टिम सुविधा दिली. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे आभार भोजलिंगवाडी अंगणवाडी सेविका मनीषा खळगे यांनी मानले




.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart