Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.

 चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत  बाबर व गुलाबराव बाबर यांचा सन्मान संपन्न.



सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये प्रगतशील युवा शेतकरी अभिजीत सुरेश बाबर यांचा सन्मान करण्यात आला.

अभिजीत बाबर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी सोडून गावी येऊन आपली शेती हीच इंडस्ट्री म्हणून काम सुरू केले. शेती ही ढोबळमानाने न करता वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केली तरच शेती फायद्याची ठरेल. शेती करत असताना सेंद्रिय ,रासायनिक आणि जैविक या खतांचा योग्य वापर करून शेती केली तर फायदेशीर ठरते. शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघेल असे ध्येय ठेवले तरच शेती आणि शेतकरी यांचे समीकरण जुळते. अभिजीत बाबर यांनी भाजीपाला व डाळिंब शेतीमध्ये प्रगती करून नवलौकिक मिळवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रगतशील युवा शेतकरी गुलाबराव भीमराव बाबर यांनी डाळिंब, द्राक्षे, ढोबळी मिरची या पिकाच्या माध्यमातून शेतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून नावलौकिक मिळवला. त्यांचाही सर्वत्र गौरव होत आहे. शिवजयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart