सांगोला तालुक्यातील भूजल परिस्थितीबाबत केंद्रीय भूजल मंडळ, जलशक्ती मंत्रालयाचा सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित.
.......................
[ केंद्रीय भूजल विभागाच्या माध्यमातून भूजलवैज्ञानिकांनी केलेल्या सविस्तर अभ्यास अहवालातील माहितीचा वापर करून स्थानिक पातळीवर भूजल व्यवस्थापन अद्ययावत करणे शक्य आहे : उपेंद्र धोंडे, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक, केंद्रीय भूजल मंडळ.]
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्या वतीने आज दि. २४ फेब्रुवारी रोजी बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये भूजल संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जल व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. एस एस पूर्ती व उपेंद्र धोंडे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. मुश्ताक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, पाण्याचा वापर काटकसरीने करणे, वृक्षारोपण वाढवणे आणि जलव्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे ही काळाची गरज आहे. पुढील काही महिन्यांत ग्रामसेवक व सरपंचांनी आपापल्या गावात यासंबंधी कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून श्री. एस एस पूर्ती, श्री. अमरनाथ व श्री. उपेंद्र धोंडे या केंद्रीय भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच डॉ. मुश्ताक शेख, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय, सोलापूर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ. मूश्ताक शेख यांनी सांगितले की, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर हि सांगोला तालुक्यातील भूजल पातळी परिस्थितीबाबत सखोल माहितीची नोंद ठेवते, स्थानिक प्रशासनाने या माहितीचा उपयोग करून जनमानसात जलजागृती केली पाहिजे. इतर तांत्रिक सत्रात श्री. एस एस पूर्ती यांनी राष्ट्रीय जलधर नकाशाकरण अभ्यास अहवाल, सांगोला याचे सविस्तर सादरीकरण केले, श्री. अमरनाथ यांनी भूजल पुनर्भरण विषयावर मार्गदर्शन केले. श्री. उपेंद्र धोंडे यांनी उपस्थितांशी स्थानिक भूजल समस्या व त्याचे निराकरण याबद्दल खेळीमेळीने संवाद साधला, यावेळी स्थानिकांनी भूजलाची घसरती पातळी व शेततळी, तसेच भूजल पुनर्भरण संरचना अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी याबद्दल उत्स्फूर्तपणे प्रश्नं विचारले तसेच आपापल्या गावातील अनुभव कथनही केले.
यावेळी केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्री. वैजिनाथ घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक , सरपंच, जलसुरक्षक, जलदूत तसेच स्थानिक सामाजिक संस्था प्रतिनिधी अशा एकूण ९५ सहभागींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने श्री. अमरनाथ, उज्ज्वल कुमार आणि इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
अधिक माहितीसाठी संपर्क:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा