Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 माण नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक; बोलेरो पिकअपसह ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगोला (प्रतिनिधी):

सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं. 139/2026 प्रमाणे बी.एन.एस. कलम 303 (2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये बेकायदेशीर वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी पोना/1228 सुजित रामचंद्र जाधव (वय 39 वर्षे, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चिनके (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील चिनके ते माण नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, दिलावर तांबोळी यांच्या शेताजवळ कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी तानाजी महादेव शितोळे (वय 25 वर्षे, रा. चिनके, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बोलेरो चारचाकी पिकअप (आरटीओ क्रमांक MH 10 BR 0227) वाहनातून शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही अधिकृत परवानगी न घेता माण नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना आढळून आला.

पोलीसांनी कारवाईदरम्यान अंदाजे ५,००,००० रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन तसेच सुमारे ७,००० रुपये किंमतीची अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ५,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्दी रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ/1264 भानवसे हे करीत असून, दाखल प्रक्रिया पोहेकॉ/138 भोसले यांनी केली आहे.

बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart