Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अकोला वासुद गावचे सांगली पोलीस दलातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पदक प्रदान .

 अकोला वासुद गावचे सांगली पोलीस दलातील वरीष्ठ  पोलीस निरीक्षक श्री.तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पदक प्रदान .




राजस्थान राज्यातील आंतरराज्य संघटित गुन्हेगार क्षेत्रातील  तसेच उत्तर भारतात प्रचंड दहशत निर्माण करून खु नाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे व त्याचा वापर करणे, दरोडा, अपहरण, खंडणी, जाळपोळ, बलात्कार आशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सन 2017 पासून फरार घोषित तीन गँगस्टर ... श्यामलाल गोवर्धनराम पुनिया, श्रीराम पाचाराम बिष्णोई, श्रवणकुमार मनोहरलाल मांजू हे  दिनांक 28/01/20 रोजी हुबळी कर्नाटक येथील नाकाबंदी तोडून  महाराष्ट्र राज्यातून  पलायन करून जात असताना राजस्थान पोलिसांनी ,महाराष्ट्र  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे कळवून  मदतीसाठी विनंती केली असता कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी  कोल्हापूर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना सूचना दिल्याने तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथक सोबत घेऊन कमी कालावधीत नाकाबंदी लावली,

     नाकाबंदी दरम्यान वर नमूद गँगस्टर्सला अडविले असता गँगलीडर श्यामलाल पुनिया याने अगदी जवळून गोळीबार केला आणि गाडीच्या खाली उतरून त्याने तानाजी सावंत व पोलीस पथकावर तसेच तेथील प्रवाशांच्यावर दहशत निर्माण करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना,

       सदर परस्थिती मध्ये पोलीस पथकाने अत्यंत धाडसाने सामोरे जाऊन प्रसंगावधान राखून अबालवृद्ध प्रवाशांची, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची काळजी घेत प्राणाची पर्वा न करता गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या गँगस्टर्सवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी फायरिंग करून दोन गँगस्टरला जखमी करून एकूण तीन कुख्यात गँगस्टार्सला जिवंत पकडण्यात यश प्राप्त केले आहे.

    या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी  मा. राष्ट्रपती भारत सरकार यांनी,

 श्री तानाजी शकुंतला दिगंबर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पोलीस शौर्य पदकाने गौरविले आहे, या अनुषंगाने दिनांक 28/07/2025 रोजी मा.पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी तानाजी सावंत  यांचा पोलीस महासंचालक कार्यालय मुबंई येथे सन्मान चिन्ह देऊन सह परिवार गौरव केला आहे, तसेच दिनांक 29/07/25 रोजी राजभवन मुबंई येथे मा. राज्यपाल श्री.सी.पी.राधाकृष्णन यांनी मा.राष्ट्रपती यांचे वतीने प्रमाणपत्र तसेच पोलीस शौर्य पदक बहाल करून गौरव केला आहे.

     पदक प्रदान सोहळ्यासाठी  मा.उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,मा.गृह राज्यमंत्री श्री. योगेश कदम, मा.पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते,


No comments