ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकस्वार जागीच ठार.
ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकस्वार जागीच ठार.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका अनकढाळ टोलनाका येथून जवळच असणाऱ्या गणेश नगर येथे शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मोटरसायकलस्वाराने पाठीमागून ट्रकला धडक दिल्याने मोटरसायकस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
खालील सविस्तर वृत्त असे की आकाश तानाजी जाधव वय वर्ष 23 हा तरुण मोटरसायकल क्रमांक mh-10 -Bs2432 या मोटरसायकल वरून बेनापुर (ता.खानापुर )या आपल्या गावी जात असताना त्याने अनकढाळ टोलनाका येथील गणेश नगर या ठिकाणी सांगोल कडून मिरज कडे जाणारा ट्रक क्रमांक MP09-HH5616 या ट्रकला पाठी मागून धडक दिली यात तो जागीच गतप्राण झाला.
या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस एपीआय मनोज बाबर व राष्ट्रीय महामार्गा गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले या वेळी त्यांना हा तरुण जागेवर गतप्राण झालेला दिसून आला. या अपघाताची माहिती त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करत आहे.


No comments