(समर्थ संस्थेमार्फत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान)
वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन व पत्रकार दिनानिमित्त खबरदार न्यूज चे संपादक व दैनिक पुढारीचे पत्रकार दत्तात्रय पवार व फाईव्ह स्टार न्युज चैनल चे संपादक व व दैनिक तुफान क्रांतीचे तालुका प्रतिनिधी, हिंदी मराठी पत्रकार संघाचे तालुका प्रतिनिधी व पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन तालुका उपाध्यक्ष नंदकुमार गायकवाड यांचा शिवप्रतिमा व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी दत्तात्रय पवार व नंदकुमार गायकवाड यांनी निर्भीड, वास्तववादी पत्रकारिता करून पत्रकारितेतील आदर्श निर्माण केला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.सध्याच्या बदलत्या युगात पत्रकरा समोर अनेक आव्हाने उभे असून,निःपक्ष पत्रकारिता करून समाजमानाचे प्रतिबिंब आपल्या पत्रकारितेत असावे व समाजमनाचा आरसा म्हणून काम करणे गरजेचे आहे. समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमाचे आभार समर्थ संस्थेचे संचालक शरदचंद्र पवार यांनी मानले यावेळी बागायतदार राजेंद्र पवार, सतीश पवार,उद्योजक सिद्धेश्वर पवार,सुशीलकुमार शिंदे,ज्ञानेश्वर धनवडे,संस्थेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार सचिव महेश दत्तू, इकबाल पाटील, मेघशाम सुरवसे,लता पाटील यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा