भोसले मळा (चिनके) शाळेत दप्तर मुक्त उपक्रमाचे आयोजन.
वाटंबरे/प्रतिनिधी:
शनिवार दि. 10 जानेवारी रोजी जि. प. प्रा. शाळा भोसलेमळा (चिनके) ता. सांगोला जि. सोलापूर येथे दप्तर मुक्त शनिवार /आनंदादायी शनिवार अंतर्गत " भाकरी - भाजी बनविणे " हा उपक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री हणमंत पवार सर यांनी भाकरी बनविण्याची कल्पना मुलांना दिली आणि काय आश्चर्य इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुला मुलींनी हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. त्याचं असं झालं, स्वावलंबी शिक्षण, भाकरी बनविण्याची कला, आई वडिलांचे कष्टाची जाणीव करून देणे, अन्नाविषयीं आदराची भावना निर्माण करणे आणि स्वतः कष्ट केल्यानंतर मिळणारा आनंद हे उद्देश समोर ठेवून हा महत्वाकांशी उपक्रम घेण्यात आला. कोणी पीठ, कोणी परात, तवा, विटा, दगड, सरपण, मसाला, टोमॅटो,बटाटा असे साहित्य एकत्र करून मुला -मुलींनी सुमारे 100 भाकरी बनविल्या तर मुलांनी भाजी बनविली. असा हा आगळा वेगळा उपक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका गुरव मॅडम, अंगणवाडी ताई यांनी मुलांना सहकार्य केले तर शाळा व्यस्थापन समितीच्या सदस्या सौ साधना सुतार, बऱ्याचशा माता पालक यांनी हजर राहून मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या.
असा हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य सर्व पालक, वाटबरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पवार सर स्वतः येऊन मुलांचे,शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार.
🎤 KHABARDAR NEWS
✨ आवाज जनतेचा ✨
━━━━━━━━━━━━━━━
🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी
🟨 संपर्क: दत्तात्रय पवार
📞 मो:8007913668






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा