माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आटपाडी मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करून आटपाडी चा चेहरा मोहरा बदलणार : यु.टी. जाधव
ग्रामीण भागातील मुलांना एमपीसी ,यूपीसी स्पर्धा परीक्षेसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जावे लागते त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जातो त्यासाठी मी आ. गोपीचंद पडळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून आटपाडी मध्ये विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे लायब्ररीची सोय करणार आहे ,तसेच आटपाडी मध्ये असणाऱ्या तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार आहे तसेच वयोवृद्ध व लहान मुलांसाठी उद्याने बनवणार आहे माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आटपाडी मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करून आटपाडी चा चेहरा मोहरा बदलणार आहे असे आटपाडीचे नूतन नगराध्यक्ष यु.टी. जाधव हे वाटंबरे येथील नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
शनिवार दि. 10 जानेवारी रोजी वाटंबरे येथे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा नागरी सत्कार आयोजित केला गेला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की आटपाडी येथील नागरिक तसेच गोपीचंद पडळकर व अमर बापू देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला आहे तो मी माझ्या विकास कामाच्या माध्यमातून सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच वाटंबरे गावचा मी जावई असल्यामुळे वाटंबरे करांनी माझा नागरी सत्कार करत माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे तो मी आटपाडीचा विकास करत सार्थ करून दाखवणार आहे
तसेच शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचे सहकारी शिक्षक तुकाराम गुरुजी , चव्हाण गुरुजी, एच यु पवार सर त्यांच्यासोबत काम करत असतानचे किस्से तसेच शिक्षक क्षेत्रातून राजकारणाचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.
या नागरि सत्कारा दरम्यान वाटंबरे गावचे माध्यमिक शिक्षक नारायण पवार सर यांना मराठा समाज सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाटंबरे गावचे पत्रकार दत्तात्रय पवार तसेच वृत्तपत्र एजंट सुखदेव पवार यांचाही यावेळी नागरी सत्कार वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी यु.टी. जाधव सरांच्या पत्नी अनिता जाधव, तुकाराम पवार, दत्तात्रय चव्हाण नामदेव पवार ,महादेव पवार या सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. यु . पवार सर यांनी केले.
यावेळी सर्व सत्कारमूर्तींचा वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. या नागरी सत्कार समारंभास मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा