जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती वाटंबरे येथे बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न.
.जि प प्रा शाळा शिंदे वस्ती वाटंबरे येथे शुक्रवार दि. ९ जानेवारी 2026 रोजी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .मुलांचे व्यवहार ज्ञान वाढावे पैशांची देवाण-घेवाण समजावी यासाठी बाल आनंद बाजाराचे आयोजन केले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन वाटंबरे गावचे सरपंच श्री नामदेव पवार ,शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री धीरज पवार ,वाटंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला वस्तीवरील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .बाजारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .अनेक पालेभाज्या फळभाज्या खाऊचे स्टॉल भेळ पाणीपुरी मंचुरियन भजी वडापाव किराणा बाजार व शैक्षणिक साहित्य यांची जोरदार विक्री झाली .मुलांना व पालकांना खूप आनंद मिळाला .सर्व पालकांचे व मुलांचे चांगले सहकार्य लाभले अंगणवाडी सेविका चन्ने.मॅडम यांचे सहकार्य लाभले .मुख्याध्यापक श्री संभाजी पवार व.उपशिक्षिका सुवर्णा सावंत .मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा