प्रिसीजन फाउंडेशन व सेवावर्धनी फाउंडेशन यांचा वाटंबरे येथे एक दिवसीय अभ्यास दौरा
.
वाटंबरे /प्रतिनिधी:
ॲटलसकॉपको लिमिटेड पुणे व सेवावर्धनी पुणे यांनी केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी फाउंडेशन यांच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानच्या माध्यमातून वाटंबरे तालुका सांगोला येथे मंगळवार दि.९ डिसेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुका कासेगाव या ग्रामपंचायतीने एक दिवसीय अभ्यास दौरा सहलीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी वाटंबरे गावास भेट दिली
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , सर्व सदस्य ,पदाधिकारी ,प्रतिष्ठित ग्रामस्थ ,महिला बचत गटाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार व विविध मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
ॲटलास कॉपको व सेवावर्धनी फाउंडेशन यांनी केलेल्या जलसंधारण कामाच्या जोरावर वाटंबरे गाव दुष्काळ मुक्त झाल्याने गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली शेती, दुग्ध व्यवसाय तसेच विविध उद्योगधंदे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे . ज्या कामामुळे गाव दुष्काळ मुक्त झाले आहे अशा त्यांनी जलसंधारण कामास भेट दिली नंतर त्यांनी दुग्ध व्यवसायातील चिलिंग व्यवसाय, पेढा व्यवसाय, गांडूळ खत प्रकल्प, मुक्त संचार गोठा , मका भरडा व्यवसाय फॅक्टरीला भेट देत त्या ठिकाणची माहिती गोळा केली तसेच गावातील महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले खंडोबा देवस्थानला ही भेट दिली व त्या ठिकाणी चालू असलेली विविध विकास कामांची पाहणी केली.
संक्षिप्त स्वरूपात.
ॲटलसकॉपको व सेवावर्धनि यांच्या माध्यमातून वाटंबरे गावांमध्ये जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाले आहेत त्यामुळे गावाचा कायापलट झाला आहे . ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेचा पाठपुरावा करून ती कामे करून घेतली आहेत त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा स्तर वाढला गेला आहे त्यामुळे गावात बागायत क्षेत्र वाढलेले आहे गावाचा आर्थिक स्तर वाढला आहे उद्योगधंदे वाढले आहेत त्यामुळे गावचा विकास स्तर वाढला आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी सेवावर्धिनीचे शिरीष तेरखेडकर ,प्रदीप माने, रेश्मा कदम तसेच वाटंबरे गावचे मधुकर पवार, प्रतीक पवार, सरपंच नामदेव पवार, सुब्राव पवार यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले आहे.
काशेगाव
सरपंच
यशपाल वाडकर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा